महत्वाची टीप







महत्वाची टीप :- माहिती पाहिजे असलेल्या Icons वर click केल्यानंतर page च्या मध्यभागी माहितीसाठी परत post या ठिकाणी click here यावर click करा.

श्री.रतन तुकाराम आत्राम (प्राथमिक शिक्षक )

सेवा निवृत्त होतांना लागणारी आवश्यक ४० मुद्दे

 ४० मुद्दे 👇

pdf पाहिजे असेल तर click here 

नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नमुन्यात माहिती सादर करणेबाबत

अ.क्र.

तपासणी मुद्दे

शेरा

नाम

 

पदनाम

 

जन्म दिनांक व पडताळणी केली आहे काय ?

 

नियत सेवानिवृत्ती दिनांक /स्वेच्छा सेवा निवृत्ती दिनांक /मयत दिनांक

 

सेवापुस्तकातील सर्व पाने भरली आहे काय ?

 

सेवा पुस्तकात सेवाप्रवेश नोंद नियुक्ती प्राधिकार्याची स्वाक्षरी आदेशानुसार घेतली आहे काय ?

 

शैक्षणिक अहर्ता व डि.एड झाल्याची नोंद सेवा पुस्तकात घेतली आहे काय ?

 

सेवा पुस्तकात बोटाचे ठसे व सचोटी व प्रतिज्ञापत्रावर कर्मचारी स्वाक्षरी व खातेप्रमुख स्वाक्षरी झाली आहे काय ?

 

सेवापुस्तकात पंचवार्षिक पडताळणी खातेप्रमुखाच्या स्वाक्षरीने झाली आहे काय ?

 

१०

स्वग्राम होम टाउन घोषित केल्याचे प्रमाणपत्र जोडले आहे काय ?

 

११

सर्व नाम निर्देशन फॉर्म कर्मचारी व खातेप्रमुख यांच्या स्वाक्षरीनिशी झाली आहे काय ?

 

१२

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रानुसार सेवापुस्तकात नोंद घेतली आहे काय ?

 

१३

कायम झाल्याची नोंद दिनांकासाहित आहे काय ?

 

१४

जात वैधता प्रमाणपत्रानुसार सेवापुस्तकात नोंद घेतली आहे काय ?

 

१५

संगणक अहर्ता प्रमाणपत्रानुसार सेवापुस्तकात नोंद घेतली आहे काय ?नसल्यास दि.१.१.२००८ पासून वर्ष ज्या तारखेला पूर्ण झाली त्या तारखे पर्यंतची दिलेल्या वेतन व भत्त्याची वसुली घेऊन वसुली तक्त्यामध्ये जोडून सेवा पुस्तकात नोंद घेतली आहे काय ?

 

१६

कर्मचारी वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्याने संगणक अहर्ता प्रमाणपत्र सादर करणेपासून सूट दिलेबाबत मा.मुख्य.कार्यकारी अधिकारी यांचे आदेशानुसार सेवा पुस्तकात नोंद घेतली आहे काय ?

 

१७

वयोमर्यादा शिथिल करणे आवश्यक आहे काय ?

 

१८

दुसऱ्या जिल्ह्यातून या जिल्ह्यात हजार झाल्याची नोंद नियुक्ती प्राधिकरण अधिकारी यांच्या आदेशानुसार घेतली आहे काय?

 

१९

नेमणूक विहित वयोमर्यादेत करणेत आली काय ?

 

२०

सेवाखंड क्षमापन ,रजा मंजुरी सुधारित वेतन नोंदी घेतल्या आहे काय ?

 

२१

अनाधिकृत गैरहजर असल्यास निकालानुसार सेवापुस्तकात नोंद घेतली आहे काय ?

 

२२

कर्मचारी निलंबित असल्यास निकालानुसार सेवापुस्तकात नोंद घेतली आहे काय ?

 

२३

वेतनवाढी नियमित काढल्या आहे काय ?

 

२४

सेवापुस्तकात रजा लेखापडताळणी खाते प्रमुखाच्या स्वाक्षरीनिशी शेवटच्या माहिन्यापर्यंत पूर्ण भरला आहे काय ?

 

२५

पदोन्नतीच्या नोंदी नियुक्त प्राधिकरणाच्या आदेशानुसार घेतली आहे काय ?

 

२६

भडकस /भोळे /चौथा वेतन आयोग (१९८६)पाचवा (१९९६),सहावा (२००६),सातवा (२०१६) वेतन निश्चिती पडताळणी मुख्य व वित्त अधिकारी यांचे शिक्का व स्वाक्षरी केलेली आहे काय ?

 

२७

सहाव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम पाच हप्त्यात भ.नि.नि.मध्ये जमा केलेबाबतची नोंद व्हाउचर व दि.नुसार घेतली आहे काय ?

 

२८

गट विमा बाबतची मासिक वर्गणी ज्या त्या वेळी कपात केलेबाबतची नोंद सेवापुस्तकात घेणेत आली आहे काय ?

 

२९

ज्या ज्या ठिकाणी बदली झाली आहे त्या त्या ठिकाणाचे कार्यमुक्त आदेश व हजर नोंद सेवापुस्तकात घेतली आहे काय ?

 

३०

ज्या ज्या गटामध्ये ज्या ज्या कालावधीत ज्या पदावर सेवा केली आहे त्या पदानुसार ना देय चौकशी दाखला विहित नमुन्यात जोडावा (स.ले.अ./स.प्र.अ./ग.शि.अ./ग/वि.अ.)

 

३१

विभागीय चौकशी चालू /प्रस्थापित /प्रलंबित /नसलेबाबत खाते प्रमुखाच्या स्वाक्षरीनिशी जोडला आहे काय ?.

 

३२

जादा रक्कम अदा असल्यास परत करणेबाबतचे संमतीपत्र जोडले आहे काय ?

 

३३

प्रा.शिक्षक पतपेढीचा येणे देणे दाखला जोडला आहे काय ?

 

३४

सेवापुस्तकात शेवटच्या पानावर वार्षिक सेवा पडताळणी खाते प्रमुखाच्या स्वाक्षरीनिशी घेणेत आली आहे लाय ?

 

३५

अंतिम वेतन प्रमाणपत्र परिपूर्ण भरून खाते प्रमुखाच्या स्वाक्षरीनिशी घेणेत आले आहे काय ?

 

३६

फॉर्म नं.५ निवृत्ती वेतन प्रकरणासोबत ३ प्रतीत जोडला आहे काय ?व त्यामध्ये कर्मचारी फोटो खाते प्रमुखांनी साक्षांकित केला आहे काय ?

 

३७

मा.मु.कार्यकारी अधिकारी यांचे कडील आदेशानुसार सेवापुस्तकात कार्यामुक्ती केल्याची नोंद खाते प्रमुखाच्या स्वाक्षरीनिशी घेणेत आला आहे काय ?

 

३८

स्वेच्छा निवृत्ती झाल्याची नोंद मा.मु.कार्यकारी यांचेकडील आदेशानुसार घेणेत आली आहे काय ?व आदेश पेन्शन प्रमाणपत्रासोबत जोडला आहे काय ?

 

३९

मयत असल्यास मृत्यू दाखला मूळ प्रतीत जोडला आहे काय ?

 

४०

पेन्शन से मधील सर्व फॉर्म मधील माहिती परिपूर्ण भरली आहे काय ? याची खात्री करावी तसेच सदराचा १ ते ४० मुद्याचा नमुना परिपूर्ण भरून जोडावा .

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:







$ BLOG ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद $$